विदेश

पाकला ३ अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य

इस्लामाबाद – पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणीमुळे हवालदिल झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानला कतारकडून ३ अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. कतारचे आमिर शेख तमिम बिन हमाद यांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावरून मायदेशी जाताना व्यापार, ऍन्टी मनी लॉंडरिंग आणि दहशतवादाच्या अर्थसहाय्याला रोखण्यात सहकार्याची हमी दिली आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर पाकिस्तानला गेल्या ११ महिन्यांपासून ४ मोठ्या देशांनी मोठे अर्थसहाय्य केले आहे. सर्वात प्रथम चीनने ४.६ अब्ज डॉलरच्या ठेवी आणि व्यवसायिक कर्जाच्या स्वरुपात पाकिस्तानला मदत केली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of