विदेश

पाकिस्तानच्या मदतीनेच अमेरिकेने केला लादेनचा खात्माः इम्रान खान

पाकिस्तानच्या मदतीनेच अमेरिकेने अल् कायदाचा म्हेरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका मुलाखती दरम्यान केला आहे.

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेट सेंटर या दोन जुळ्या इमारतींवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा २०११ रोजी अमेरिकेने पाकिस्तानात घुसून खात्मा केला होता. महत्त्वाचं म्हणजे याआधी नेहमीच पाकिस्तानने आपल्याला ओसामा बिन लादेनसंबंधी कोणतीही माहिती नव्हती असा दावा केला होता. पण पहिल्यांदाच जाहीरपणे पाकिस्तानने ओसामा बिन लादेन आपल्या भूमीवर असल्याची कल्पना असल्याचे सांगितले आहे. यावेळी इम्रान खान यांनी लादेन विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानने मदत केल्याचेही सांगितले.

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of