विदेश

पाकिस्तानने रद्द केली दिल्ली लाहोर बससेवा !

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम भारत सरकारने रद्द केल्यामुळे पाकिस्तानने निषेध म्हणून दिल्ली लाहोर बस सेवा रद्द केली आहे.

पाकने या आधीच दोन देशांच्या दरम्यान धावणारी समझौता एक्‍स्प्रेसही रद्द केली आहे. अटलबिहारी सरकारच्या काळात ही बस सेवा 1999 साली पहिल्यांदा सुरू झाली होती. पण सन 2001 साली संसदेवर हल्ला झाल्यानंतर भारताने ती बंद केली होती. नंतर ती जुलै 2003 साली सुरू झाली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती पाकिस्तानचे दूरसंचार मंत्री मुराद सईद यांनी सांगितले.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of