विदेश

भारतीय लष्कराकडून मिठाई घेण्यास पाक सैन्याचा नकार

जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. मात्र तरी आजच्या ईदच्या निमित्ताने भारतीय लष्कराने पाकिस्तानला मिठाईचा पुडा देण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानने भारताकडून देण्यात येणारी मिठाई स्वीकारण्यास नकार दिला.

हुसैनीवाला बॉर्डरवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही पाकिस्तानच्या सैन्याला ईदच्या निमित्ताने मिठाई पाठवण्याचा प्रस्ताव दिला मात्र पाकिस्तानच्या सैन्याकडून त्यासाठी नकार आला आहे. कोणताही मोठा सण असतो तेव्हा दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना मिठाई पाठवतात ही प्रथा आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of