विदेश

भूतानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जल्लोषात स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. आज ते भूतानला पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा भूतान दौरा आहे. तर दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. यावेळी भूतानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी विमानतळावर मोदींना वेलकम केले. त्यांच्या आगमनावर सलामी दिली गेली. रंगीबेरंगी कपड्यांमध्ये हजारो नागरिक मोदींच्या स्वागतासाठी उभे होते. दौऱ्यादरम्यान मोदी द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of