विदेश

मला पाकिस्तानी पत्रकार खूप आवडतातः डोनाल्ड ट्रम्प

पाकिस्तानी पत्रकार नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांना अनेकदा ट्रोल केले जाते. मात्र, आता चक्क अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानच्या पत्रकारांचे कौतुक केले आहे. मला पाकिस्तानचे पत्रकार खुप आवडतात असे ते म्हणालेत. पण हे कौतुक आहे की टोला याबाबत अनेकजण वेगवेगळे तर्क लढवित आहे.

 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वॉशिंग्टन येथील व्हाईट हाऊसमध्ये जाऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही उभय देशांतील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दहशतवाद, व्यापार, अफगानिस्तान यांसह काश्मीरच्या मुद्द्यावरुनही ट्रम्प आणि इम्रान खान यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी, पत्रकारांना प्रतिप्रश्न करत डोनाल्ड ट्रम्प  यांनी आर यू फ्रॉम पाकिस्तान? असा सवाल केला. त्यानंतर मला पाकिस्तानी पत्रकार खूप आवडतात. मला 2-4 पाकिस्तानी पत्रकार हवे आहेत. मला पाकिस्तानी पत्रकार हे अमिरेकन पत्रकारांपेक्षा अधिक आवडतात, असेही ट्रम्प यांनी म्हटले. विशेष म्हणजे यावेळी, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेही या पत्रकार परिषदेला संबोधित करत होते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of