विदेश

‘या’ पेटलेल्या लोकांचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

जर तुम्हाला रस्त्यावरुन जाताना पेटलेल्या अवस्थेतील माणसे दिसली तर तुम्हालाही धडकी भरेल ना ? मात्र हे चित्र दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात दिसले. रस्त्यावर एक नव्हे दोन नव्हे तर 32 माणसे पेटलेल्या अवस्थेत चालताना दिसली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही माणसे पाहून रस्त्यावरील लोकांना धक्का बसला. काही जणांना वाटले की हे सामूहीक आत्मदहनाचा प्रयत्न करीत आहेत. मात्र असं काहीही नव्हतं तर या 32 जणांनी स्वतःला आग लावून विश्वविक्रम केला आहे.

पेटलेल्या अवस्थेत एकाच वेळी ३२ व्यक्तींनी चालण्याचा हा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमध्ये… केपटाऊनमधील सिनेमात स्टंट करणाऱ्या केविन बिटर व्हॅरनॉन विल्यमल्स आणि ग्रँड पॉवेल या तिघांच्या नेतृत्वात हा स्टंट करण्यात आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of