विदेश

सिक्रेट सांन्ता होऊन बिल गेट्स यांनी दिल्या ‘या’ महिलेला इतक्या भेटवस्तू

ख्रिसमस हा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाचे आकर्षण म्हणजे सॅन्ताक्लॉज. सॅन्ताक्लॉज येईल आणि आपल्याला भेटवस्तू देईल या आशेने लहानमुलं सॅन्ताक्लॉजची वाट पाहत असतात. हल्ली आता अनेक कंपन्यामध्ये सिक्रेट सांन्ता हा गेम सुध्दा ख्रिसमसला मोठ्या प्रमाणात खेळला जातो.  या सिक्रेट सांन्तामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. हा खेळ जगभरात मोठ्या उत्साहाने खेळला जातो.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी देखील सिक्रेट सांन्ता या खेळात भाग घेतला होता. बिल गेट्स स्वतः सिक्रेट सांन्ता झाले होते आणि त्यांनी चक्क एका महिलेला अफलातून भेटवस्तू दिल्या आहेत. जेव्हा या महिलेला कळाले की, खुद्द बिल गेट्स यांच्याकडून आपल्याला या भेटवस्तू मिळाल्या आहे. तेव्हा तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता.

‘रेडइट गिफ्टच्या’ सिक्रेट सांन्ता या स्पर्धेत मिशिगन येथील एका 33 वर्षीय महिलेने सहभाग घेतला होता. बिल गेट्सही या स्पर्धेत गेल्या काही वर्षांपासून सहभागी होत आहेत. पण, कधी ते आपल्याला सिक्रेट सँटा होऊन अशा काही अद्वितीय भेटवस्तू देतील अशी कल्पनाही नसल्याचं म्हणत शेल्बीने आनंद व्यक्त केल्याचं वृत्त सीएनएनने प्रसिद्ध केलं आहे.

बिल गेट्स यांच्याकडून शेल्बीसाठी आलेल्या भेटवस्तूंमघ्ये हॅरी पॉर्टर सॅण्ट हॅट, हॉगवर्ड्स कॅसल,  (बऱ्याच काळापासून विक्रीसाठी बंद असणारं) आरटूडीटू पझल, हॅरी पॉर्टर आणि स्टारवॉर्ल लिगो सेट, हाताने विणलेलं एक ब्लँकेट, ट्विन पिक्स शोसंदर्भातील भेटवस्तू, एल. एल. बीन जॅकेट, ट्विन पिक्सचं दुसरं पर्व, द ग्रेट गॅट्सबे हे पुस्तक तसंच हे पुस्तक लिहिणारे लेखक एफ स्कॉट फित्झरलॅड यांनी स्वत: लिहीलेली चिठ्ठी, खूप सारे ओरिओ बिस्कीटचे बॉक्स आणि इतर अनेक लहानमोठ्आ भेटवस्तूंचा जणू ढिगच तिच्यासाठी पाठवण्यात आला होता.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of