विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या पुरस्कारासाठी नामांकन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्यांना हे नामांकन 2021 च्या पुरस्कारासाठी मिळालं आहे.

इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील शांतता करारासाठी मध्यस्थी करुन दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यासाठीच हे नामांकन देण्यात आलं आहे. नर्वोच्या संसदेतील सदस्य ख्रिश्चन टायब्रिंग-गजेडे यांनी ट्रम्प यांना नामांकित केलं आहे.

ट्रम्प यांना ती निकषांसह हे नामांकन देण्यात आले आहे. त्यामध्ये पहिली अट म्हणजे इतर राष्ट्रांसोबत सहकार्याची भावना जपत वाटाघाटी करण्यात ट्रम्प यांनी पुढाकार घेतला. दुसरी अट म्हणजे मध्य पूर्व भागात सैन्यांची घट केली आहे. तर, तिसरा निकष म्हणजे शांततेचा प्रसार करण्यातही ट्रम्प यांनी पुढाकार घेतला.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of