Dubai airport
विदेश

‘या’ कारणामुळे भारतीय कर्मचाऱ्याला दुबई विमानतळावरुन अटक

भारतीय कर्मचाऱ्याला दोन आंबे चोरल्याप्रकरणी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे.

2017 साली दुबई विमानतळावर काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने प्रवाशांच्या बॅगेमधून दोन आंबे चोरले होते. भारतात जात असलेल्या एका बॅगमधून आपण आंबे चोरल्याची कबुली देखील या तरुणाने दिली होती. “मला तहान लागली होती, मी पाणी शोधत होतो. त्यावेळी मी फळांची पेटी उघडली आणि त्यातले दोन आंबे मी खाल्ले अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.’ 2018 साली त्याची पोलिसांनी चौकशी केली आणि समन्स देऊन त्याला सोडण्यात आले होते.  हा तरुण भारतीय प्रवाशांच्या बॅगा उघडून पाहत असल्याचे विमानतळावरिल सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. त्यामुळे  आता त्याला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या प्रकरणातील खटल्याचा निकाल 23 सप्टेंबरला येणार आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of