four policeman killed in paries
विदेश

पॅरीसमध्ये पोलिसानेच केली चार पोलिस अधिकाऱ्यांची हत्या

पॅरीसमध्ये एका घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिस कर्मचाऱ्यानेच चार पोलिस अधिकाऱ्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र या हल्लेखोर पोलिस कर्मचाऱ्याला गोळी घालून कंठस्नान घालण्यात आले. पोलिस मुख्यालय असणारा पॅरीसचा मध्यवर्ती भाग या घटनेनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना वाढल्याच्या निषेधार्थ पोलिसांनी संप केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of