विदेश

अमेरिकेच्या लष्करी हवाई तळावर पुन्हा इराकचा क्षेपणास्त्र हल्ला

इराणने पुन्हा एकदा अमेरिकेच्या लष्करी हवाई तळावर आठ क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 4 जण जखमी झाले आहेत. यात इराकचे 2 लष्करी अधिकारी आणि 2 एअरमन आहेत.

इराणने अमेरिकेच्या इराकमधील अल-बलाद या हवाई तळावर  हल्ला केला. एफ-16 या लढाऊ विमानांचे हे मुख्य हवाई तळ आहे. आपल्या हवाईदलाची क्षमता वाढविण्यासाठी इराकने एफ-16 हे लढाऊ विमान अमेरिकेकडून खरेदी केले होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने या हवाई तळांना दोन आठवड्यांपूर्वीच स्थलांतरित केले होते. मात्र या हल्ल्यात अमेरिकी सैन्याला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

हल्ला करणारे क्षेपणास्त्र नेमके आले कुठून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इराणने आपले सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानीच्या हत्येनंतर मागील आठवड्यात याच सैन्य तळावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of