विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात ‘या’ देशाने केले अटक वॉरंट जारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह आणखी काही जणांविरोधात इराणने अटक वॉरंट जारी केले आहे.

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी  3 जानेवारीला ठार झाला होता. अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये हा हल्ला केला होता. या हल्ल्याला अध्यक्ष ट्रम्प आणि इतर 30 अधिकारी जबाबदार असून त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरावा अशी मागणी इराणने इंटरपोलकडे केली आहे. इराणच्या सरकारी टीव्हीवर हे वृत्त देण्यात आलं आहे.

इराणच्या या मागणीचा काहीही परिणाम होण्याची शक्यता नसून इंटरपोलने त्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अमेरिका आणि इराणदरम्यानचा तणाव यामुळे वाढण्याची शक्यता आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of