विदेश

भारत-चीन-रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची आज होणार बैठक

रशिया, भारत व चीन या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची आज शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) मॉस्कोत होणाऱ्या बैठकीच्या निमित्ताने भेट होणार आहे. हे मंत्री भोजनावेळी एकत्र भेटणार आहेत. या दरम्यान दोन्ही देशांतील सीमेवरील तणावाच्या परिस्थितीवरून द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

शांघाय सहकार्य संघटनेची मॉस्कोमध्ये आज (बुधवारी) आणि गुरुवारी बैठक होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅव्हॉव्ह आहेत.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे सुद्धा एससीओच्या संबंधित द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. तसेच तिन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री भोजनावेळी एकत्र भेटणार आहेत. भारत व चीन यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची मॉस्कोत भेट होण्याच्या एक दिवस आधी, बुधवारी या दोन्ही देशांच्या लष्करांच्या कमांडर्सची सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी पूर्व लडाखमध्ये भेट झाली होती.

आरआयसी (रशिया-भारत-चीन) चौकटीत या तिन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हितांच्या द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा करण्यासाठी वेळोवेळी भेटत असतात.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of