osama bin ladens son and al qaeda heir hamza bin laden dead
विदेश

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा ठारः डोनाल्ड ट्रम्प

अल कायदाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा बिन लादेन ठार झाला असल्याचे वृत्त अमेरिकन माध्यमांनी आधीच दिलं होतं. त्यावर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

ट्रम्प यांच्या वतीने व्हाइट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘हामजा बिन लादेनचा मृत्यू हा दहशतवाद्यांना धक्का आहे. वडिलांचा दहशतवादी वारसा चालवणाऱ्याचा मृत्यू अतिरेकी संघटनांसाठी इशारा आहे. त्यांचा म्होरक्या आणि कटकारस्थानं रचणारा नेता गेला, ही मोठी गोष्ट आहे.’

अमेरिकेने हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत हामजा बिन लादेनला ठार मारण्यात आले आहे. हमजाचा खात्मा झाल्याने दहशतवादविरोधी कारवाईला मिळालेलं हे मोठं यश मानलं जात आहे.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of