विदेश

इजिप्तने भंगारात काढलेली विमाने पाकिस्तान खरेदी करणार

Egypt mirage v jets

इजिप्तच्या हवाई दलाने भंगारात काढलेल्या मिराज-V फायटर या विमानांची खरेदी पाकिस्तान करणार आहे. अशी 36 विमाने पाकिस्तान इजिप्तकडून खरेदी करणार आहे, यासाठी विमानांच्या खरेदी व्यवहाराविषयी चर्चा सुरु आहे.

मिराज ही मूळची फ्रेंच बनावटीची विमाने असून डासू कंपनीने सुद्धा या विमानांचे उत्पादन थांबवले आहे. इजिप्तच्या हवाई दलातूनही ही विमाने केव्हाच निवृत्त झाली आहेत. मात्र, पाकिस्तान या विमानांमध्ये सुधारणा करून ती स्वत:च्या ताफ्यात दाखल करून घेणार आहे.

मिराज-V विमाने भारतीय वायूदलातील मिराज-२००० विमानांच्या आसपासही नाहीत. भारताच्या मिराज-२००० विमानांनीच फेब्रुवारी महिन्यात बालाकोट परिसरात एअर स्ट्राईक केला होता. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाच्या ताफ्यात लवकरच फ्रेंच बनावटीची अत्याधुनिक अशी राफेल विमाने दाखल होणार आहेत.

त्यामुळे आता पाकिस्ताननेही आपले वायूदल सुसज्ज करण्यासाठी इजिप्तकडून मिराज-V विमाने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of