Pakistan
विदेश

पाकिस्तानचे भारताबरोबर युध्द झाल्यास पाकिस्तानचा पराभव होईलः इम्रान खान

पाकिस्तानचे जर भारताबरोबर युद्ध झाले तर यात पाकिस्तानचा पराभव होईल असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. अल-जझीरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

इम्रान खान यांनी भारताला दोनदा-तीनदा अणुयुध्दाची धमकी दिली आहे. मात्र त्यांनीच एका मुलाखतीमध्ये पराभव मान्य केला आहे. अल जझीराला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी भारतासोबत युध्द झाले तर पाकिस्तानाला पराभवाचा सामना करावा लागेल असे म्हटले आहे. त्यांनी हे वक्तव्य भारताला दिलेल्या अणुयुध्दाच्या धमकीवर विचारलेल्या प्रश्नावर  केले आहे.

इम्रान खान म्हणाले, पाकिस्तान कधीही अणुयुद्धाची सुरुवात करणार नाही. मी एक शांतताप्रिय व्यक्ती आहे. मी युद्धाच्या विरोधात आहे. युद्धाने समस्या सुटणार नाही, असं मला वाटतं. युद्धाचे अनपेक्षित परिणाम दिसतात. व्हिएतनाम, इराकच्या युद्धांना बघा, त्या युद्धांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्या कदाचित युद्ध ज्यासाठी केले गेले त्याच्यापेक्षाही गंभीर आहेत.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of