विदेश

पाकिस्तान दूध झाले महाग, किंमत ऐकूण थक्क व्हाल

Pakistan milk price

पाकिस्तानात लोकांना चहा पिणे देखील महाग झाले आहे. कारण पाकिस्तानातील दुधाच्या किंमती गगनाला भिडल्या आहे. एक लिटर दुध तिथे 140 रुपयाला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे खूप हाल झाले आहेत.

पाकिस्तानात दूध पेट्रोल-डिझेलपेक्षा महाग झाले. पाकिस्तानात सध्या पेट्रोल 113 रुपये आणि डिझेल 91 रुपये प्रति लीटर आहे.

मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी तेथे दूध, ज्यूस आणि पाण्याचे स्टॉल लावले जातात. त्यामुळे दुधाची मागणी अचानक वाढली. त्याचा परिणाम दुधाच्या दरावर झाला. हे दर नियंत्रित करण्यासाठी सरकारने कोणतीही उपाय योजना केली नाही, असा आरोप होत आहे.

पाकिस्तानी वर्तमानपत्र एक्सप्रेस न्यूज नुसार डेअरी माफिया मोहरमच्या वेळी नागरिकांची अक्षरश: लूटमार करत होते. मोहरमला दुधाची किंमत प्रचंड वाढली.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of