विदेश

तरचं भारताबरोबर चर्चा शक्यः इम्रान खान

जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवण्याचा भारताने घेतलेला निर्णय जर मागे घेतला तरचं भारतासोबत चर्चा होऊ शकते, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. आणि ते एवढ्यावरच नाही थांबले तर त्यांनी पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे.

काश्मीर मुद्द्यावरील चर्चेत प्रामुख्याने काश्मीरी लोकांना सहभागी केलं पाहिजे. परंतु भारताशी चर्चा तेव्हाच होईल, जेव्हा भारत काश्मीरवरील अवैधरित्या असलेला ताबा सोडेल. तसंच सैन्य परत बोलावेल आणि कर्फ्यू काढेल, असं इम्रान खान यांनी नमूद केलं आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of