Saudi Arabia Aramco company drone attack
विदेश

सौदी अरेबियातील सगळ्यात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला

जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियातील तेल कंपनी ‘अरामको’च्या दोन फॅसिलिटी सेंटर्समध्ये ड्रोन हल्ला झाला आहे. अशी माहिती सौदीच्या सरकारी गृहमंत्रालयाने दिली आहे.

शनिवारी सकाळी सौदीच्या अरामकोच्या दोन तेल संयंत्रांवर विद्रोह्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास हा हल्ला झाल्यानंतर दोन्ही तेल कंपन्यांमध्ये भीषण आग लागली होती.

दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू केला असल्याचे सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of