विदेश

गुगलने कर्मचाऱ्यांना दिलं ‘हे’ अनोख गिफ्ट

गुगलच्या कर्मचाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. गुगलने कर्मचाऱ्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस सुट्टी दिली आहे.

यासंदर्भात कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक नोट पाठवली आहे. यात लिहिले आहे, ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांवर दबाव वाढला आहे. कर्मचारी केवळ सोमवार ते गुरुवार काम करतील तर शुक्रवार ते रविवारपर्यंत त्यांना विकली ऑफ मिळेल.

कंपनीने प्रत्येक विभागातील टीम लीडर्सना आपल्या टीमला मदत करायला सांगितली आहे. तसेच, नव्या व्यवस्थेनुसार प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाची जबाबदारी आणि वेळ निर्धारित करण्यात यावा. जर एखादा कर्मचारी विकली ऑफच्या दिवशीही काम करत असेल, तर त्या बदल्यात त्या कर्मचाऱ्याला सोमवारी ऑफ देण्यात यावा, असेही कंपनीने सांगितले आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of