विदेश

भारत-पाकिस्तान यांच्यातील मध्यस्थी करण्यास तयारः डोनाल्ड ट्रम्प

Us president Donald trump

भारत-पाकिस्तान यांच्यामधील तणाव गेल्या दोन आठवड्यांपासून कमी झाला आहे. त्यामुळे दोन्ही देश जर तयार असतील तर आपण मध्यस्थी करण्यासाठी तयार आहोत असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.

26 ऑगस्ट रोजी जी 7 परिषदे दरम्यान ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर 2 आठवड्यांनी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशांना मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेल्या कोणत्याही मुद्द्यावर तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नसल्याचे मत ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान मोदी यांनी व्यक्त केलं होतं.

सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांना सांगितलं की, काश्मीर मुद्द्यावरून भारत-पाक यांच्यात तणाव आहे. मला वाटतं की दोन आठवड्यापूर्वी जितका तणाव होता त्यापेक्षा आता कमी आहे.

भारत-पाक यांच्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी ट्रम्प यांनी आपण पुढाकार घेऊ असं म्हटलं होतं. त्यांनी पुन्हा एकदा त्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ट्रम्प म्हणाले की, मला दोन्ही देशांची साथ पसंत आहे. दोन्ही देशांची इच्छा असेल तर मदत करण्यास तयार आहे. दोन्ही देशांना माहिती आहे की त्यांच्यासमोर मध्यस्थीचा प्रस्ताव आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of