विदेश

कोरोना विषाणूची उत्पत्ती वुहानच्या लॅब मध्ये झाली; चीनच्या महिला शास्त्रज्ञाकडे पुरावे

जगभरात थैमान पसरविणाऱ्या कोरोना विषाणूची उत्पत्ती वुहानच्या लॅब मध्येच झाली असल्याचा दावा चीनच्या एका महिला शास्त्रज्ञाने केला आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

चीनमधील या व्हायरोलॉजिस्ट महिला शास्त्रज्ञाचं नाव डॉ. ली मेंग असं आहे.  कोरोना विषाणू हा मानवनिर्मित असल्याचा खळबळजन दावा केला आहे. तसेच आपल्याकडे याबाबतचे सबळ पुरावे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. चिनी सरकारच्या धमकीनंतर त्या सध्या अमेरिकेत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे.

व्हायरोलॉजिस्ट डॉ. ली मेंग म्हणाल्या की, “जगभरात विळखा घालणाऱ्या या कोरोना महामारीची निर्मिती वुहानमधील लॅबमध्ये  झाली आहे. हा विषाणू मानवनिर्मित आहे. याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत. लवकरच मी ते जगासमोर आणणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of