गुन्हेगारी ताज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या बातम्या

पुण्यात लग्नास नकार दिल्याने तरुणीवर चाकू हल्ला

पुण्यातील हडपसर या भागातील तरुणीने प्रेमसंबध तुटल्यानंतर  लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने तिचे अपहरण करुन तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तरुणीला गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हडपसर इंडस्ट्रीयल परिसरात ही घटना घडली आहे. मुंढवा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद रमेश सोनवणे, नदीम शेख (रा़. रामटेकडी) आणि चंदन चव्हांडके (रा़. कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़.

याप्रकरणी वडकीनाका येथे राहणाऱ्या एका २५ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिसांकडे तक्रार दिली आहे़.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of