ताज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या बातम्या विदेश

पाकिस्तानात 15 ऑगस्ट काळा दिवस जाहिर

पाकिस्तानात 15 ऑगस्ट  काळा दिवस म्हणून जाहिर करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने या संदर्भातले एक पत्रकच जारी केले आहे.

भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणजे १५ ऑगस्ट. या दिवसाची सगळेच मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र पाकिस्तानने 15 ऑगस्ट काळा दिवस घोषित केला आहे. सॅटेलाईट टीव्ही चॅनल्स, एफएम रेडिओ चॅनल्स या सगळ्यांना ही सूचना पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी कोणताही विशेष कार्यक्रम करायचा नाही. काश्मीरसंदर्भात आत्मियता असलेल्या बातम्या आणि व्हिडिओच प्रसारित करावेत असंही या पत्रकात पाक सरकारने म्हटलं आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of