ताज्या बातम्या लाईफस्टाईल

श्रावणात ‘हे’ पदार्थ खाऊ नयेत

श्रावण महिन्यातील आपला आहार कसा असावा याबाबत अनेकांना माहिती नसते. मात्र या महिन्यात इन्फेक्शन होण्याचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे श्रावण महिन्यात आर्युवेदानुसार हिरव्या पालेभाज्या शक्यतो खाऊ नयेत.

या भाज्या खाल्ल्याने पोटात गॅसचा त्रास होऊ शकतो. याशिवाय भाज्यांवर हिरव्या रंगाचे किडे असतात. अनेकदा हे किडे डोळ्यांना दिसत नाहीत आणि ते खाल्ल्यामुळे पोटाचे अनेक आजार होऊ शकतात.

श्रावणात वांगही खाणं टाळावं. पोटात गॅस तयार होणाऱ्या भाज्यांमध्ये आयुर्वेदाने वांग्याचाही समावेश केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात वांग खाण्यापासून स्वतःला रोखा. पावसात वांग्यात अनेक किडे लागतात. त्यामुळे वांग्याची भाजी खाणे शक्यतो टाळावे

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of