ताज्या बातम्या ब्रेकिंग न्यूज मनोरंजन महत्वाच्या बातम्या

आता बिग बी करणार महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत

सांगली, कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हात पुढे आलेले आहेत. यात शाळकरी मुले, सामाजिक संस्था, सोसायटीतील नागरिक, शिर्डी देवस्थान, मराठी कलाकार या सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे.

काल रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी २५ लाखाची मदत केली होती. त्यांनी २५ लाखांचा चेक मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिला होता आणि आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करणार असल्याचे त्यांनी नुकतेच कौन बनेगा करोडपतीच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी पुरग्रस्तांना मदत करणार असून त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मी रक्कम जमा करणार असून या संकटात लोकांनी देखील मोठ्या प्रमाणे आपल्या बांधवांना मदत केली पाहिजे असे मी या माध्यमाद्वारे लोकांना सांगत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of