लाईफस्टाईल

कोणत्याही गोष्टीसाठी महिलाच कशा जबाबदार…?

आज मी अनुष्का शर्माची पोस्ट वाचली त्यात तिने सुनील गावसकर यांना खडेबोल सुनावले आहे. ती म्हणते विराटच्या खराब कामगिरीवर टीका करताना तिचा उल्लेख का…? त्यावर तिने कठोर शब्दात आपले म्हणणे मांडताना इतर क्रिकेटरच्या पत्नीला जसा सन्मान मिळतो तसा मला का नाही, असा सवाल करत आपली व्यथा मांडली.

अनुष्कासाठी हे नवीन नाही,तिला कायमच विराटच्या कामगिरीमुळे कधी चाहत्यांच्या तर कधी दिग्गज व्यक्तींच्या देखील टीकांचे धनी होताना आपण पाहिले आहे.

यावरुन एक प्रश्न मनात घर करुन जातो की, अनुष्का-विराट यांच्या वैयक्तीक आणि खासगी लाईफला वेगळ करणे आपल्याला का जमत नाही बर.

हे अनुष्काच्या विषयी होत अस नाही, तुम्ही गल्लीतला एकादा व्यक्ती दारु पिऊन मेला किंवा असा जरी मेला तरी लोक म्हणतात त्याची बायकोच खराब ये, ती भांडण करते त्यामुळेच तो दारु पितो…मला सांगा त्याला काय बायकोने दारु आणून दिली का कि तिने पाजली…साधा सोपा विचार आहे तो त्याच्या मर्जीने दारु पितोय…

इतिहास साक्षीला आहे… महिलांनाच नवरा मेला की, सती जावे लागत असे…महिलांच सर्व बंधने घातली जात असे, त्यांच्यावर अत्याचार केली जात आजही आहेच ते म्हणा…

महिलांनाच अग्नी परिक्षा द्यावी लागते, सती देखील तिनेच जायचे असे का…सर्व त्याग  महिलांसाठीच….पुरुषांच्या वाटेला त्यातल काही आले का हो…

आज एवढ्या मोठ्या क्रिकेटरने कोणाच्या पत्नीविषयी टीका करणे अतिशय चुकीचे आहे. आपण महिलेला देवाचा दर्जा देतो.त्याच देशात सगळ्यात जास्त अत्याचार हा महिलांवरच होताना दिसतो. मग तो कोणताही धर्म का असेना…

ही कोणावर केलेली टीका नाही तर महिलांविषयी होणाऱ्या अत्याचाराविषयी होत असेलेल्या प्रकाराचा विरोध आहे.

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of