लाईफस्टाईल

तुम्हाला सतत भूक लागते ? तर हे आजार असू शकतात…

तुम्हाला जर सतत भूक लागत असेल तर वेळीच सावधान व्हा. कारण सतत भूक जर लागत असेल तर हे आजार तुम्हाला असू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते आजार …
मधुमेह हा आजार आबालवृद्धांमध्ये झपाट्याने वाढत आहे. बदलत्या लाईफस्टाईमुळे हा आजार वयाच्या कोणत्याही टप्प्यावर बळावण्याचा धोका वाढला आहे. सतत भूक लागणं हे मधुमेहातील एक लक्षण आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.
पोटात जंत झाल्यास तुम्हांला सतत भूक लागू शकते. कारण जंत परजीवी असतात. अनेकदा ते पोटातील आहारातून मिळणारी पोषकद्रव्यं शोषून घेतात. यामधूनच शरीरात फॅट वाढणं, रक्तातील साखरेची पातळी वाढणं अशा समस्या बळावतात.
ताणतणावामध्ये असणार्‍या व्यक्तीदेखील अनियमितपणे खात असतात. यामुळे त्यांच्यामध्ये सतत खाण्याची इच्छा बळावत राहते. मेंदूवर ताण आल्यानंतर कॉर्टिकोट्रोपिनचा प्रवाह वाढतो. यामधूनच अड्रेनालाइनचं प्रमाणही वाढतं. हे भूकेचं प्रमाण वाढण्याचं एक कारण आहे.
Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of