लाईफस्टाईल

बडिशेप खाण्याचे हे आहेत फायदे

जेवण झाल्यानंतर आठवणीने खाण्यात येणारा पदार्थ म्हणजे बडिशेप आहे. मात्र सगळेचजण नियमित बडिशेप खातातंच असे नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला बडिशेप खाण्याचे फायदे सांगितल्यावर तुम्ही नियमित बडिशेप खायला सुरुवात कराल हे नक्की.

बडिशेप खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते.

मासिकपाळीच्या दिवसात पोटात जास्त दुखत असेल तर महिलांनी साखरेसोबत बडिशेप खावी. पोटदुखी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

बडीशेप नियमित खालली तर दृष्टी चांगली होते. रोज जेवण झाल्यानंतर एक चमचा बडीशेप खा. याशिवाय अर्धा चमचा बडीशेपची पूड, एक चमचा खडीसाखरसोबत दूधात घालून प्या. यामुळे दृष्टी सुधारेल.

सकाळी रिकाम्या पोटी बडिशेपचं पाणी प्यायल्याने मेंदू थंड राहतो आणि शरीरातील रक्तही स्वच्छ होते.

(टीप- हे उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. )

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of