लाईफस्टाईल

मुलाखतीला जाताना अशी घ्या काळजी !

मुलाखतीला जाताना केवळ ज्ञान असून चालत नाही तर तुमचे व्यक्तीमत्व देखील तितकेच आकर्षक असले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला मुलाखतीला जाताना कोणती काळजी घ्यायची याची माहिती देणार आहोत.

मुलाखातीसाठी तयार होत असताना तुम्ही कोणत्या कंपनीसाठी आणि प्रोफाइलसाठी मुलाखात देत आहात हे आधी लक्षात घ्या. जर तुम्ही कॉर्पोरेट सेक्‍टरमध्ये जॉबच्या मुलाखातीसाठी जात असाल तर शक्‍यतो निळा, ग्रे किंवा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करा. तसेच फॉर्मल ड्रेसमुळे तुमची समोरच्यावर चांगली छाप पडते.

मुलाखातीसाठी जाताना हेअर स्टाइलवर लक्ष देणंही महत्त्वाचं आहे. तुमचे केस तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर घालतात. मुलींनी शक्‍यतो केस मोकळे सोडावेत किंवा सिंपल पोनी टेल बांधावा. मुलांनी मुलाखातीसाठी जाताना क्‍लिन शेव्ह आणि हेअर स्टाइल सिंपल ठेवावी.

मुलाखतीला जाताना नेहमी सकारात्मक विचार करा. आधीच नकारात्मक विचार करायला सुरुवात करु नका. आणि तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असू द्या. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दिसून येईल.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of