लाईफस्टाईल

या कारणामुळे काळे पडू शकतात तुमचे अंडरआर्म्स…

महिलांना अंडरआर्म्स काळे पडणे ही एक आजकाल समस्याच वाटते. अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी त्या नेहमीच महागड्या क्रीम देखील खरेदी करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. पण तुमचे अंडरआर्म्स का काळे पडतात याचा विचार केला का, कधी. चला आम्ही सांगतो तुम्हाला…
आपण अंडरआर्म्समधील केस काढण्यासाठी हेअर रिमूव्हल क्रिमचा वापर करतो. त्यामुळे देखील आपले अंडरआर्म्स काळे पडू शकतात.
आपल्याला अतिशय घाई असल्यामुळे आपण जर केस काढण्यासाठी रेझरचा वापर करत असलाल तर ते देखील तुमचे अंडरआर्म्स काळे पडण्याचे कारण असू शकते.
 रेझरने केस काढल्यामुळे नंतर येणारे केस हे कडक येतात, यामुळे त्वचा काळी पडते.कामाच्या ठिकाणी आपण घामाचा वास येऊ नये, यासाठी काही केमिकल युक्त डिओ किंवा परफ्यूम आपण वापरतो. त्यामुळे सुद्धा अंडरआर्म्सची त्वचा काळी पडू लागते.
 तुम्हाला अतिप्रमाणात जर घाम येत असेल तरी देखील अंडरआर्म्सच्या जागेत मळ तयार होतो, परिणामी त्वचा काळी पडू लागते. या कारणांमुळे जर आपली त्वचा काळी पडत असेल तर हे प्रकार टाळावे आणि त्वचेची योग्य काळजी घ्यावी.
Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of