kapalbhati pranayama
लाईफस्टाईल

कपालभाति प्राणायमाचे फायदे तुम्ही वाचलेत का?

कपालभाति प्राणायम हा एक योगप्रकार आहे. याचे फायदे तुम्हाला जर माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत.

कपालभाति योगासन करायला सिद्धासन, पद्मासन किंवा वज्रासन स्थितीत बसा आणि हात गुडघ्यांवर ठेवा. हातांच्या सहाय्याने गुडघे पकडून शरीर ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या पूर्ण क्षमतेने दीर्घ श्वास घेत छाती फुगवा. यानंतर श्वास सोडताना पोटाला आतल्या बाजूला ओढा. ज्याक्षणी तुम्ही पोटाच्या मांसपेशींना सैल सोडता श्वास आपोआप फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. कपालभाति केल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर काढायला मदत होते. दम्याच्या रुग्णांनी नियमित कपालभाति केल्यास त्यांचा आजार बराच बरा होऊ शकतो. डोळ्यांखालील काळी वर्तुळ निघून जातात. कपालभाति प्राणायम केल्याने दात आणि केसांसंबंधी सर्व रोग बरे होतात.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of