PM Narendra Modi
लाईफस्टाईल

यामुळे पंतप्रधान मोदी आहेत फिट, हा आहे त्यांचा डाएट प्लॅन

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 69 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मोदींचे फिट असण्यामागचे कारण सांगणार आहोत. त्यांचा दररोजचा डाएट प्लॅन काय असतो याची माहिती देणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काम पूर्ण झाल्यानंतर रात्री कितीही उशीरा झोपले तरी दुसऱ्या दिवशी ते पहाटे 5 वाजता उठतात. सकाळी उठल्यावर सर्वात आधी ते योगासनं करतात. त्यानंतर नाश्त्यात ते साधं गुजराती खाणं खातात. त्यातही त्यांना पोहे फार आवडतात. याशिवाय ते सकाळी खिचडी, उपमा, खाखरा खायला प्राधान्य देतात. सकाळी नाश्त्यासोबत त्यांना आल्याचा चहा प्यायला आवडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी चहाचे चाहते आहेत. दुपारच्या जेवणात मोदी मसाले नसलेला संतुलित आहार घेतात. दुपारच्या जेवणात शक्यतो डाळ, भात, बाजी आणि दही असतं. गव्हाच्या चपाती ऐवजी ते गुजराती भाकरी खाण्याला प्राधान्य देतात. याशिवाय पंतप्रधानांना संसदेतील कँटीनमधील फ्रूट सलाड खाणं फार आवडतं.

नरेंद्र मोदी यांचे रात्रीचं जेवण फार हलकं फुलकं असतं. ते रात्री गुजराती खिचडी खाणं पसंत करतात. याशिवाय भाकरी, डाळ आणि मसाल्यांशिवायची भाजी खातात. कधी कधी तर ते फक्त उकडलेल्या भाज्याच खातात.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of