लाईफस्टाईल

केस गळतीपासून सुटका करायची असेल तर या गोष्टींची काळजी घ्या

केस गळती ही एक सध्या गंभीर समस्या बनली आहे. अनेक पुरुष आणि महिला केसगळतीने त्रस्त आहेत. आपल्या काही सवयीमुळे देखील केस गळत असल्याचे समोर आले आहे. आज आम्ही तुम्हाला त्या कोणत्या सवयी आहेत की ज्यामुळे केस गळती होते याची माहिती देणार आहोत.

अनेक जण फ्रेश राहण्यासाठी दररोज शॅम्पूने केस धुतात. मात्र दररोज शॅम्पूने केस धुणे तुम्हाला महागात पडू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज शॅम्पूने केस धुतल्याने केस खराब होतात. त्यामुळे एक किंवा दोन दिवसाआड केस धुवावेत. अनेकजण केसाना रंग देणे, ब्लीच करणे, डाय करणे यासारखी केमिकल ट्रिटमेंट केसांवर अवलंबतात. यामुळे केस कमकुवत होऊन ते गळू लागतात. यामुळे केसांवर अशाप्रकारची केमिकल ट्रिटमेंट करण्यापूर्वी काळजी घ्या. तुमच्या नियमित खाण्या-पिण्याच्या सवयीमुळेही केस गळतात. बाहेरील तेलकट, फास्ट फूट यासारखे अनेक पदार्थांचे शरीराप्रमाणे केसांवरही विपरित परिणाम होतो. तुमच्या रोजच्या जेवणात प्रोटीन आणि आयन या घटकांची कमी असेल तर केस गळतीचे प्रमाण वाढते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of