कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी नागरिक इंटरनेटवर कोरोना संदर्भातील माहिती शोधत आहे. याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. त्यामुळे कोरोनाची कोणतीही माहिती शोधण्यापूर्वी काळजी घेणे गरजेचे आहे.

सध्या तरी कोरोना व्हायरस रोखण्यासाठी अधिकृत अॅप नाही. दरम्यान, सायबर हल्ला करणाऱ्यांनी CovidLock असा एक रॅन्समवेअर तयार केला आहे. त्यामुळं अशा अॅपपासून सावध राहा. अशा अॅपमधून तुमचा फोन हॅक करून ब्लॅकमेल करत पैसे उकळण्यात येतात.

कोरोना व्हायरसबाबत जागतिक आरोग्य संघटना आणि जगातील देशांमधील सरकारची अधिकृत वेबसाइटवरून मिहिती दिली जाते. त्यासाठी खास अशी वेबसाइट नाही ज्यावर विश्वास ठेवता येईल. दरम्यान, इंटरनेटवर कोरोना व्हायरसशी संबंधित वेबसाइटस आहेत. यावरून बँकिंगसह खाजगी माहितीची चोरी केली जाते.  त्यामुळं अशा वेबसाइटवर जाणं टाळा.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of