लाईफस्टाईल

सापाला पाहून ती घाबरली, मात्र तो साप नसून होते…

तुम्हालाही जर रस्त्यात साप दिसला तर साहजिकच तुम्ही देखील घाबरणार. अशीच घटना एका तरुणी सोबत घडली. आणि तिने हा किस्सा फेसबुकवर पोस्ट केला आहे.

झाले असे की, फेसबुक युझर फातिमा दाऊदला तिच्या बिल्डींगच्या पार्कींगमध्ये एक साप दिसला. या सापाला पाहून ती जोरजोरात ओरडली.  तिचे ओरडणे ऐकूण तिच्या समोरुन जाणारी एक वयस्कर महिला देखील घाबरली. पण फातिमा सांगते की, तो साप नव्हताच. तर आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, तो साप नव्हता तर मग काय होते.

फातिमा म्हणते की, हा साप नसून एका महिलेची खोटी वेणी होती. हे जेव्हा मला कळाले तेव्हा मला देखील हासू अनावर झाले होते. जर कोणाची वेणी हरवली असेल तर घेऊन जा. वेणीचे काहीही नुकसान झालेले नाही. असेही तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. ही पोस्ट सध्या फेसबुकवर चांगलीच व्हायरल होत आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of