लाईफस्टाईल

तांदळाच्या पीठाच्या फेस पॅकचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

अनेकांना चेहऱ्यावर छोट्या पुटकुळ्या, मुरुम अशा समस्या जाणवत असतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येण्यासारखा उपाय सांगणार आहोत.

तांदळाच्या पीठाचा फेसमास्क तयार करुन तो चेहऱ्यावर लावल्यास चेहरा तजेलदार होतो आणि चेहऱ्यावरील पुटकुळ्या देखील कमी होतात.

तांदळामध्ये सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून त्वचेचं रक्षण करण्याचे गुणधर्म असतात. तांदाळामध्ये अमिनो अॅसिड आणि व्हॅटामिन्स पुरेपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावरील चमक वाढते.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील डाग, मुरुम कमी होतात.

तांदळाचा मास्क कसा करावा-

एका भांड्यात तांदळाचं पीठ घेऊन त्यात मध आणि गुलाब पाणी टाकून नीट मिक्स करुन घ्या. त्यानंतर यात बेसन टाका व पुन्हा एकदा हे मिश्रण नीट मिक्स करा. तयार झालेला हा लेप चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. त्यानंतर हा लेप वाळल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा प्रयोग आठवड्यातून 1 वेळा करा.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of