लाईफस्टाईल

रोगप्रतिकारशक्ती वाढवायची मग ‘या’ फळांचे करा सेवन

कोरोनाच्या महासंकटकाळात कोरोना विरुध्द लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणं खूप गरजेचं आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करायचे याची माहिती देणार आहोत.

भारत सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएएआय) अलीकडेच अशा काही पदार्थांबाबत माहिती दिली आहे. यामध्ये आवळा, संत्री, पपई, सिमला मिरची, पेरू आणि लिंबू यांचा समावेश आहे. जीवनसत्त्व सी असण्याव्यतिरिक्त या फळांमध्ये असे बरेच घटक आहेत, ज्यामुळे इतर फायदेही होतात.

आवळ्यात जीवनसत्त्व सी असल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतं आणि रोगांविरूद्ध लढायला पुरेशी क्षमता देते. अर्धा कप कोमट पाण्यात आवळ्याचा रस समान प्रमाणात मिसळा आणि दररोज प्या.

संत्री या फळामध्ये जीवनसत्त्वं सी भरपूर असतं, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आवश्यक असतं. जीवनसत्त्व सी जीवाणू आणि विषाणूंशी लढणार्‍या पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीस प्रोत्साहन देतं. याव्यतिरिक्त संत्र्यामध्ये भरपूर पॉलिफेनोल्स असतात जे विषाणूजन्य संक्रमणापासून बचाव करतात.

किवी हे फळ आपल्या शरीराची जीवनसत्व ‘क’ ची गरज मोठ्या प्रमाणावर भरून काढते. दरोरोज एक किवीचे फळ खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्व ‘क’ मिळते. सोबतच ताप, डेंग्यू सारख्या संक्रमण होणाऱ्या आजारांपासून सुद्धा आपला बचाव होतो. हे यामुळे होते कारण हे फळ आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of