लाईफस्टाईल

हिवाळ्यात मध खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचलेत का?

मध हे आरोग्यासाठी गुणकारी असते. मधामध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज, माल्टोज अशा सर्व महत्वाच्या आणि आवश्यक शर्कारांचे मिश्रण असते. त्यामुळे थंडीत मध खाणे हे खूप फायदेशीर असते. चला तर मग जाणून घेऊयात मध खाण्याचे फायदे-

मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत

हिवाळ्यामध्ये पटकण भूक लागत नाही त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरते.

त्याचप्रमाणे मधाच्या सेवनाने ताजेतवाने राहण्यास मदत तर होतेच, शिवाय पाचन शक्ती सुधारते.

खाज, खरूज यासारख्या त्वचेसंबंधीत आजारांचा ज्यांना त्रास होतो त्यांनी ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. त्यामुळे या त्वचा रोगांचा त्रास कमी होतो.

ज्यांना डोळ्यांशी संबंधीत आजार असेल त्यांनी गाजर आणि मधाचे एकत्रित सेवन करणे फायद्याचे ठरते. दोन लहान चमचे मध गाजराच्या रसामध्ये घालून प्यावे. मधाबरोबर घेतलेला हा गजराचा सर निरोगी दृष्टीसाठी फायद्याचा असतो. डोळ्यांत सतत पाणी येण्याचा त्रास असणाऱ्यांनाही मध घालून गाजराचा रस पिणे फायद्याचे ठरते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of