लाईफस्टाईल

सतत घसा खवखवत असेल तर ‘हे’ उपाय करा

हिवाळ्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दी, घसा दुखणे, घसा खवखवणे हे आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जर हिवाळ्यात सतत घसा खवखवण्याची समस्या जाणवत असेल तर त्याच्यावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

घशातली खवखव कमी करण्यासाठी तुम्ही तुळस, लवंग, काळी मिरी आणि आलं घातलेला गरम चहा प्यायल्यास घशाला आराम मिळतो. या सर्व गोष्टी गरम असतातच शिवाय या सर्वात अँटी बॅक्टेरियल गुणधर्मही आहेत. त्यामुळे घशातली खवखव कमी व्हायला मदत होते.

तुम्ही काढा करुन पिऊ शकता. काळी मिरी, बत्तासा, लवंग, तुळस घालून पाणी उकळवा. पाणी उकळून निम्म्याने कमी झालं की हा काढा पिण्यायोग्य झाला. या काढ्याने घशाची खवखव निघून जाते आणि घशाला आराम मिळतो.

हळदीचं दूध प्यायल्याने फक्त घशालाच आऱाम मिळतो असं नाही तर संपूर्ण शरीरासाठी याचा फायदा होतं. निरोगी आरोग्यासाठी हळदीचं दूध नियमितपणे पिणं हे फायदेशीर आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of