लाईफस्टाईल

टॅटू काढताय, तर होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

tattoos

हल्ली टॅटू काढण्याचा ट्रेंड आला आहे. तरुणांमध्ये तर हा ट्रेंड वाढतच चालला आहे. ती एक स्टाईल झाली आहे असे म्हणायलाही हरकत नाही. मात्र टॅटू काढल्यामुळे गंभीर आजार देखील होऊ शकतो. त्यामुळे टॅटू काढण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

टॅटूमुळे एचआयव्ही, मलेरिया किंवा डेंग्यूसारखे भयंकर आणि जीवघेणे आजार होऊ शकतात. शरीरावर टॅटू गोंदवून घेण्यापूर्वी तुमच्यासाठी वापरण्यात येणारी सुई चांगल्या पद्धतीने धुवून घेतली की नाही याकडे लक्ष द्या. नवीन सुईने टॅटू काढून घेणं केव्हाही चांगलं. जर सुई चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून घेतली नसेल तर तिथून टॅटू काढू नका.

ज्या ठिकाणाहून तुम्ही टॅटू काढून घेणार आहात तिथली चांगल्याप्रकारे चौकशी करा. त्यांच्याकडे टॅटू काढण्याचं लायसन्स आहे की नाही याचीही विचारणा करा.

जे्हा तुम्ही टॅटू गोंदवायला जाता तेव्हा सुईच्या सहाय्याने रंग शरीराच्या आत टाकला जातो. जेव्हा सुई शरीरात जाते तेव्हा तिचा संपर्क रक्ताशी येतो. तुम्ही टॅटू गोंदवून घेण्यापूर्वी एचआयव्ही, मलेरिया किंवा डेंग्यूचा एखाद्या रुग्णाने टॅटू काढला असेल तर त्यामुळे तुम्हालाही हे आजार होऊ शकतात. त्यामुळे टॅटू काढताना योग्य ती माहिती घेऊनच टॅटू काढावा. नाही तर हे टॅटूचे वेड जीवावर बेतू शकते.

 

 

 

 

 

 

 

 

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of