लाईफस्टाईल

शांत झोपेसाठी हे उपाय करा…

बदलत्या जीवनशैलीमुळे  ताण-तणाव  वाढत चालले आहेत. याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे काही जणांना रात्री झोप देखील येत नाही. दिवसेंदिवस ही समस्या वाढत चालली आहे. चला तर मग आज आम्ही तुम्हाला शांत झोप येण्यासाठीचे काही उपाय सांगणार आहोत.

सध्या मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही यांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत आहे. या इलेक्ट्रॉनिक पडद्यांचा झोपेवर खूप परिणाम होतो. यामधून येणारा प्रकाश मेंदूला अजूनही दिवस आहे असा संकेत देतो. त्यामुळेही मग निद्रानाशाचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. झोपेच्या काही वेळे आधीपासून यांचा वापर टाळावा.

चांगल्या झोपेसाठी नियमित चिंतन किंवा ध्यानधारणा देखील फायदेशीर ठरू शकते. यामुळे मानसिक शांतता मिळते, विचारात स्पष्टता येते, ज्यामुळे झोप येण्यासाठी मदत होते.

रात्रीचे जेवण कमी करावे किंवा आहार थोडा हलका असावा.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of