लाईफस्टाईल

सफरचंदाचे सालाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत. पण सफरचंदाच्या सालापासून होणारे फायदे अनेकांना माहित नाही. अनेकजण सफरचंदाचे साल काढून खातात पण सफरचंद सालासकट खाल्ले पाहिजे. यात अनेक पोषक जीवनसत्त्व असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याच सफरचंदाच्या सालापासून होणारे फायदे सांगणार आहोत.

सफरचंदाच्या सालीमध्ये लोह, फॉलिक अ‍ॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असल्याने अ‍ॅनिमिया रोगाविरोधात लढण्याची क्षमता वाढते. रक्तवाढ होते.

सफरचंदाच्या सालाच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. रक्त शुद्धीकरणाची प्रक्रियादेखील होते.

लठ्ठपणा कमी होतो- वजन कमी करण्यासाठी सफरचंद सालीसकट खावे. यामुळे चरबी कमी होते. यातील उर्सोलिक अ‍ॅसिडमुळे वजन कमी होते.

मोतीबिंदूपासून बचाव होण्यासाठी सफरचंद सालांसकट खाण्याने मदत होते. तसेच नियमितपणे सफरचंद खाल्ल्यास मोतीबिंदू होत नाही.

सफरचंदात जास्त प्रमाणात फायबर असल्याने पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी ते अतिशय उपयुक्त आहे. यामुळे शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठीही मदत होते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of