लाईफस्टाईल

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

बदाम खाणं हे आपल्या बुध्दीसाठी खूप फायदेशीर आहे. बदाम खाल्ल्याने बुध्दी तल्लख होते. त्यामुळे लहान मुलांना नेहमी बदाम खायला सांगितले जातात. मात्र बदाम खाण्याचा एकच फायदा नसून अनेक फायदे आहेत. विशेषतः भिजवलेले बदाम गर्भवती महिलांनी खाल्ले तर याचा त्यांना खूप फायदा होतो.

भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. भिजवलेल्या बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्समुळे शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

महिलांनी गरोदर असताना स्वत:कडे आणि बाळाच्या वाढीकडे पूर्ण लक्ष देण्याची विशेष गरज असते. त्यामुळे तिच्या आहारात पौष्टिक आणि सकस पदार्थांचा समावेश असणं आवश्यक आहे. गरोदर असताना स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खावेत. गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्या आणि गर्भाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ होण्यात मदत होते.

बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.

नियमित भिजविलेले बदाम खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of