लाईफस्टाईल

हिमोग्लोबिन वाढवायचे मग ‘या’ गोष्टींचा आहारात करा सामावेश

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी शरीरात हिमोग्लोबिन जास्त असणे महत्त्वाचे असते. कारण जर शरीरात हिमोग्लोबिन नसेल तर अशक्तपणा जाणवतो. विश्रांती घेतल्यानंतरही भोवळ आल्यासारखं वाटतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा सामावेश करायचा याची माहिती देणार आहोत.

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमध्ये व्हिटॅमिन सीचं सेवन करणं फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात संत्रे, लिंबू, किवी, पेरुचा समावेश लाभदायक ठरु शकतो.

शरीरात फॉलिक ऍसिडची कमतरता झाल्यास, हिमोग्लोबिनची लेवलही कमी होऊ लागते. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन लेवल उत्तम राखण्यासाठी फॉलिक ऍसिडचा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. डाळ, कोबी, ब्रोकली, बदाम, मटार, केळी आहारात सामिल करु शकता.

रक्त तयार होण्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता मनुके भरुन काढण्यास मदत करतात. लोहयुक्त काळे मनुके खाल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.

डाळिंबामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सीसह लोहदेखील चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे डाळिंबामुळेही हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते.

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमध्ये व्हिटॅमिन सीशिवाय, हिरव्या पालेभाज्यांचाही आहारात समावेश करणं फायदेशीर आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of