लाईफस्टाईल

ही एक गोष्ट केल्याने तुमचे आयुष्य वाढणार !

walk daily

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जण चालणेच विसरुन गेले आहेत. कुठे जवळपास जरी जायचे असेल तर गाडी घेऊन जातात. तसेच ऑफीस मध्ये आठ-नऊ तास बसून काम करतात यामुळे शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. खरं तर चालणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहेत आणि त्याचे फायदेही सगळ्यांना माहितीच आहे. पण एका संशोधनातून असे सिध्द झाले आहे की, आता चालण्याने तुमचे आयुष्य देखील वाढणार आहे.

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार एका दिवसात 9 तासांपेक्षा अधिक वेळ बसणे मृत्यूला आमंत्रण देणं आहे. या रिसर्चमध्ये शारीरिक हालचालींची जसे की, चालणे, स्वयंपाक बनविणे, भांडी घासणे, कपडे धुणे, जॉगिंग करणे यासांरख्या ॲक्टिविटींची तुलना करण्यात आली आहे.

या संशोधनातून असे आढळले की, ज्या व्यक्ती सर्वात कमी ॲक्टिव असतात त्यांना मृत्यूचा धोका सर्वात जास्त आहे. वैज्ञानिकांचं मत आहे की, पब्लिक हेल्थचा संदेश साधारण शब्दात असा असला पाहिजे की, कमी बसा आणि जास्त वेळं चालणं-फिरणं करा.

त्यामुळे तुम्हाला जर दिर्घायुषी व्हायचे असेल तर दररोज कमीत-कमी पाऊण तास तरी चालण्याचा सोपा व्यायाम नक्की करा.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of