लाईफस्टाईल

तुम्हाला घरात राहून करता येतील ‘ही’ कामे

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (22 मार्च) रोजी जनता कर्फ्युची घोषणा केली आहे. त्यामुळे आज सगळेजण घरी आहेत. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की आज घरी बसून काय करायचे तर आज आम्ही तुम्हाला घरी बसून करता येण्यासारखी  काही काम सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला बोरही होणार नाही आणि तुम्ही एन्जॉय देखील कराल.

कुटुंबाला वेळ द्याः तुमच्या कामाच्या व्यस्त व्यापामुळे तुम्हाला घरच्यांशी गप्पा देखील मारता येत नाही. त्यामुळे आजचा पूर्ण दिवस तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारा. यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

मुलांसोबत वेळ घालवाः तुमच्या कामाच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तुम्हाला तुमच्या मुलांकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत खेळा. मस्ती करा यामुळे त्यांनाही आनंद होईल.

जसे तुम्ही घरी आहात, तसेच तुमचे मित्र, नातेवाईकही घरी असतील. ते देखील असेच घरी राहून कंटाळले असतील. तेव्हा तुम्ही त्यांना व्हिडीओ कॉल करु शकता. तुम्ही ग्रुप व्हिडीओ कॉल करुन एकाच वेळी तुमच्या सर्व मित्रमंडळींसोबत गप्पा मारु शकता. तसेही रोजच्या धावपळीच्या आयुष्यात मित्रांसोबत गप्पा मारणे जरा अवघड असते. तर हा वेळ तुम्ही तुमच्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांसोबत घालवू शकता.

झोप घ्याः रोज ऑफिस असल्याने अनेकांची ही तक्रार असते की त्यांची झोप पूर्ण होत नाही. तर या काळात तुम्ही तुमची ती अनेक वर्षांची झोप पूर्ण करु शकता. यामुळे तुमचा मेंदू रिफ्रेश होईल आणि तुम्हाला कंटाळा येणार नाही.

अनेकांना पुस्तकं वाचण्याचा छंद असतो. मात्र, ऑफिस आणि दुनियादारीमध्ये अनेकदा आपला हा छंद कुठल्यातरी शेल्फच्या कोपऱ्यात धूळ खात पडलेला असतो. ती धूळ झटका आणि तुमचा तो छंद नव्याने जोपासा. तुमच्या आवडीचं पुस्तकं वाचा, यामुळे तुम्हाला जराही कंटाळा येणार नाही.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of