महाराष्ट्र

अन् दिलीप सोपलांच्या एका फोनवर त्याला नोकरीवर परत घेतलं

सोलापूर – गर्दीचा सिझन सुरू होता म्हणून त्या तिघांचं तिकीट काढता आलं नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून तो एसटी (ST ) महामंडळात कंडक्टर म्हणून काम करत होता. आता त्याची बीडला बदली झाली होती अन हा पॅसेंजरच तिकीट न काढल्यामुळ पकडला गेला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला डायरेक्ट बडतर्फच केलं. चूक झाली, माफी मागितली, दंड भरतो म्हंटल, शेवटी मंत्रालयात चकरा मारल्या तरी नोकरीवर घेईनात. आता मात्र संयम तुटत चालला होता, कुठंतरी कामाला जावं असा विचार तो करत होता. याबाबत, 422 कड राहणाऱ्या मुंशी यांनी एकदा साहेबांच्या म्हणजेच शिवसेनेचे आमदार दिलीप सोपलांच्या कानावर घातलं होतं. साहेबांनीही तुझं होऊ दे, शेवटी माझ्याकड ये असं म्हटलं होतं.

मुंशी एका कामासाठी मुंबईला गेले होते, त्यावेळी साहेबांचा शिवसेना प्रवेश हाय, म्हणून साहेब मुंबईला आल्याचे त्यांना कळालं. मुंशीन साहेबांची भेट घेत मी पण मातोश्रीवर येणार असं सांगितलं. त्या कंडक्टरच कामं होईना तेही सांगितलं. साहेब म्हणाले आपण आधी जाऊन येऊ मग ये तू माझ्याकडे. बार्शीतून गेलेल्या काही गाड्यात मुंशीही मातोश्रीवर गेले. साहेबांचा जल्लोषात शिवसेना प्रवेश झाला. कार्यकर्तेही खुश झाले. शिवसेना प्रवेशानंतर साहेबांनी सगळ्यांच्या जेवणाची सोय बघितली. मुंशीला बोलावून घेतल, जेवणं केलं का?  हो साहेब. आता, रूमवर आराम कर आणि 6 वाजता माझ्याकड ये असं सांगितलं.

मुंशीही 6 वाजता साहेबांच्या रूमवर गेले. ये बस, सांग काय प्रकरण आहे ते. मुंशीन सगळं सांगितल. साहेबांनी ऐकून घेताच मोबाईल हातात घेतला. थेट परिवहन मंत्री दिवाकर रावतेना फोन. तिकडून आवाज, बोला साहेब. साहेब म्हणाले.. एक विनंती आहे आमची. तिकडून..  साहेब आदेश द्यायचा तुम्ही… साहेब म्हणाले.. माझा सहकारी आहे गावाकडंचा, जवळचा कार्यकर्ता माझा. त्याचा घडलेला सगळा  प्रकार सांगितला. तेवढा दंड घ्या अन् त्यांना कामावर रुजू करून घ्यायला सांगा. त्याचा घरी प्रपंच आहे, आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे . असं म्हटल्यावर दिवाकर रावतेनी तिकडून होकार दिला. मुंशी समोरच हा सर्व प्रसंग घडला होता. मुंशी एकदम खुश झाले. साहेबांचे आभार मानून निघून गेले. 5 दिवसात त्या कंडकटरला आगारातून बोलवण्यातं आलं. केवळ 4,500 रुपये दंड भरून त्यांना ड्युटीवर रुजू करून घेतले. ते तर आनंदाच्या भरात 9 हजार घेऊन गेले होते.

शिवसेना प्रवेशाची धांदल, बार्शीत कार्यकर्त्यांची तयारी, मुंबईतील व्यस्त शेड्युल, एवढ्या प्रचंड ताण-तणावात आणि शिवसेना प्रवेशानंतर पहिलेच कामं कार्यकर्त्यांचे केले. बार्शीच्या गरीब कंडकटरला परत मिळवून दिलेली आयुष्याची भाकरी. ऑर्डर घेतली त्यादिवशी कंडक्टरच्या डोळ्यात पाणी होतं, तर त्याचा भाऊ मोठ्ठा हार आणि पेढयाचा पुडा घेऊन बंगल्यावर होता. मला वाटतं नाही आता काही बोलायची गरज असेल.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of