पुणे महाराष्ट्र

आता धरणांमध्येही घेता येईल हाऊस बोटचा आनंद

नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. कारण आता तुम्हाला राज्यातील धरणांमध्येही हाऊस बोटचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी केरळ आणि काश्मीरला जाण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. ही संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.

जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील धरणांमध्ये नौकाविहार, हाऊस बोट, पॉवरसेलिंग व पॅरासेलिंग, साहसपूर्ण खेळ यांना परवानगी देण्याची कार्यपद्धत यासाठीची नियमावली आणि दरनिश्‍चितीमध्ये सहजता आणि सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासनाने समिती नेमली आहे. नौकानयनामुळे पर्यटनास चालना मिळून प्रकल्पग्रस्तांना व स्थानिक बेरोजगारास रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

Please Login to comment
avatar
  Subscribe  
Notify of